वडनेर व फुकटा पंचायत समिती सर्कल मधला गाव मानकापूर येथे प्राथमिक शाळेतील शिक्षक बदली केल्याबाबत गट विकास अधिकारी व गट शिक्षक अधिकारी पंचायत समिती हिंगणघाट यांना निवेदन


वडनेर व फुकटा पंचायत समिती सर्कल मधला गाव मानकापूर येथे प्राथमिक शाळेतील शिक्षक बदली केल्याबाबत गट विकास अधिकारी व गट शिक्षक अधिकारी पंचायत समिती हिंगणघाट यांना निवेदन


वर्धा सलग वडनेर व फुकटा पंचायत समिती सर्कल मधला गाव मानकापूर येथे प्राथमिक शाळेतील शिक्षक बदली केल्याबाबत गट विकास अधिकारी साहेब व गट शिक्षक अधिकारी पंचायत समिती हिंगणघाट यांना निवेदन देण्यात आले. वर्धा जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस मा श्री गुरुदयालसिंग जुनी व सर्व गावकऱ्यांकडून  निवेदन देण्यात आले

 

अँकर ..मानकापूर या गावांमध्ये प्राथमिक शाळेतील शिक्षक बदली केल्याबाबत मानकापूर येथे रहिवासी असून आमच्या गावामध्ये प्राथमिक शाळा आहे, प्राथमिक शाळांमध्ये १ ते ५  वर्ग पर्यंत शिक्षण घेणारे मुलं मुली आहेत, तिथे ३ शिक्षकाची आवश्यकता आहे तरीसुद्धा तिथे २ शिक्षण आहे, तरीही आम्ही आमचे मुले मुली प्राथमिक शाळांमध्ये शिकवत आहोत परंतु प्रशासनाकडून त्यामधून सुद्धा १ शिक्षक वगकायचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे, म्हणून आम्ही गावकऱ्यांचे म्हणणं आहे की आम्हाला ३ शिक्षक तुम्ही नाही देवू शकत असेल तरीही चालेल पण आम्हाला २  शिक्षकाची अत्यंत आवश्यकता आहे.

 

जर का कोणत्या शिक्षकाची बदली झाल्यास आम्हाला दुसरा शिक्षक देण्यात यावे, जर असं न केल्यास आम्ही संपूर्ण गावकरी शाळेला कुलूप ठोकून शाळेसमोर धरणे आंदोलन करून सरकारच्या निषेध करू, प्राथमिक शाळेमध्ये गरीबाचे मुलं शिकतात यांच्यावर पण अन्याय होत आहे, ही बाब लक्षात घेऊन 24 तासात बदली जाधव सर यांची थांबवण्यात आली नाही तर आम्ही सर्व गावकरी पंचायत समिती हिंगणघाट येथे धरणे आंदोलन करणार आहे. कृपया करून काही दिवसासाठी त्याला थांबवण्यात  यावी किंवा दुसरा शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावा मुला मुलींच्या पाठय क्रभात खंड पडल्यास किंवा नुकसान झाल्यास शासन जिम्मेदार राहील

 शुक्रवारच्या दिवशी शिक्षक मा श्री विनायक जाधव सर यांना एक पत्र मिळाला की तुमची बदली करण्यात येत आहे मानकापूर या गावातून एक शिक्षक कमी झाल्यास त्या मुलांचे वर्ष व दुर्लक्ष होणार त्यासाठी सर्व गावातल्या महिला व पुरुष सर्वांनी एक प्राथमिक शाळा येथे मीटिंग करून वर्धा जिल्हा (उपाध्यक्ष) राष्ट्रवादी युवक काँग्रेस गुरुदयालसिंघ  जुनी ग्रामपंचायत सदस्य वडनेर व शाळा व्यवस्थापन समिती तथा पालक वर्ग आणि शिक्षकांसोबत चर्चा करून मानकापूर प्राथमिक शाळा येथे चर्चा करण्यात आले _ हिंगणघाट पंचायत समिती येथे सर्व गावकरी व पालक वर्ग यांनी निवेदन देण्यात आले उपस्थित मानकापूर गावातले उपसरपंच मा श्री सुभाषभाऊ अढाल, , मोठ्या संख्येने महिला व पुरुष गावकरी उपस्थित होते                    

आझाद भारत न्युज24 विदर्भ चीप ब्युरो संतोष देशमुख वर्धा

Post a Comment

Previous Post Next Post